
वैभववाडी : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दिगशी गांगेश्वर विद्यामंदिर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.ग्रा.प.सदस्या सायली स्वप्नील धुरी यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सौ.धुरी यांनी प्रयत्न केले.अधिश्री चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्यावतीने शाळेतील मुलांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. तसेच शिवसेना शाखा दिगशी यांच्या कडून मुलांना वाह्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी युवासेना जिल्हाचिटणीस -स्वप्नील धुरी, ग्रामपंचायत उपसरपंच चंद्रकांत पाष्टे, ग्रामपंचायत सदसया सायली धुरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास पाष्टे, शिवसेना शाखाप्रमुख देवेंद्र पाष्टे ,युवासेना विभाग प्रमुख राजेश पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र पाटील, गोपाळ पाटील, सुरेश चव्हाण , महादेव गोरुले , संजय पाष्टे, दशरथ पाष्टे, दीपिका मोरे, अनुश्री धुरी, शाळेच्या मुख्याध्यापिका भोसले मॅडम ,धावले मॅडम, अंगणवाडी सेविका अश्विनी तावडे, संगीता कदम, संगीता पवार, रिया धुरी, समीक्षा शिवगण, धनश्री साळवी, रुचिता सोलकर, योगिता धुरी,सुनंदा पाष्टे, वैशाली मोरे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.