अंगणवाडीतील मुलांना युवासेनेकडून शालेय साहित्याचं वाटप...!

Edited by: विनायक गावस
Published on: August 24, 2023 10:45 AM
views 147  views

सावंतवाडी : कोनापाल गावातील सर्व अंगणवाडीतील मुलांना युवासेना तळवडे विभागाच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप युवासेना उपजिल्हाधिकारी सागर सोमकांत नाणोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख संदिप पांढरे, शाखा प्रमुख संदिप बाईत, युवासेना विभाग प्रमुख रोहन मल्हार, उपविभाग प्रमुख सुरज डिचोलकर, निरवदे युवासेना शाखा प्रमुख मधुकर भाईडकर, युवासेना शाखाप्रमुख मनोहर पारकर, रोहित परब, राजेश भाईडकर, दिनेश पेडणेकर, मनीष मल्हार, तुषार शेटकर, दिनेश पेडणेकर, रोशन मल्हार, दत्ता बाई, प्रसाद पालकर, ग्रामपंचायत सदस्य दशरथ मल्हार, तळवडे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काजरेकर, आनंद पांढरे, रमेश पांढरे, शालेय शिक्षक, शिक्षिका छोटे बालमित्र उपस्थित होते.