मराठा समाज उत्कर्ष मंडळाकडून विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप | संजू परब यांच्या वाढदिवसाचं औचित्य

Edited by: विनायक गावस
Published on: August 19, 2023 14:20 PM
views 157  views

सावंतवाडी : मराठा समाज उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून अध्यक्ष संजू परब यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग चे वाटप केले.

मराठा समाज उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून गेले कित्येक वर्षे संजू परब हे सामाजिक कार्यात सक्रिय आहेत त्यांचे वडील कै. जगन्नाथ परब यांनी या मंडळाची उभारणी करत छोटेखानी लावलेल्या या वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर केले आज वटवृक्ष रुपी मंडळाचे हे कार्य संजू परब स्वतः पुढे घेऊन जात आहेत त्यांच्या या कार्यात त्यांचा सहभाग असतो. श्री. परब हे आपला वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रमातून राबवित असतात आजही त्यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत मंडळाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी स्कूलबॅगचे वाटप केले.

या कार्यक्रमाला जिल्हा बँक संचालक महेश सारंग भाजपा सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावले बांधा मंडल अध्यक्ष महेश धुरी विनोद सावंत दिलीप भालेकर बंटी पुरोहित आधी पदाधिकारी उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त 50 विद्यार्थ्यांना औपचारिक रित्या स्कूलबॅगचे वाटप करण्यात आले. मात्र, येत्या काही दिवसात संपूर्ण तालुक्यात मंडळाच्या माध्यमातून स्कूल त्याचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.