
सावंतवाडी : राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्गतर्फे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांच्या माध्यमातून महिला पदाधिकाऱ्यांना साड्यांच वाटप करण्यात आले. युवराज लखमराजे भोंसले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी युवराज लखमराजे भोंसले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या हस्ते साड्यांच वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर, सचिव रामचंद्र कुडाळकर, जिल्हा संपर्कप्रमुख शिवा गावडे, जिल्हा सदस्य मनोहर पाटील, लक्ष्मण पेडणेकर, महिला जिल्हा उपाध्यक्ष पूजा सोनसुरकर, तालुकाध्यक्ष महिला संचिता गावडे, तालुका उपाध्यक्ष संगिता पारधी, शहर अध्यक्ष सेजल पेडणेकर, अंकिता माळकर, सपना नाईक, रेवती मुननकर, समिक्षा मोघे,रूपाली रेडकर,वनिता राणे, कविता गंगावळकर,सुरेखा पवार आदी उपस्थित होते.