संदेश निकम मित्रमंडळाकडून गणेश पुजन साहित्यासह शिधावाटप

Edited by: दिपेश परब
Published on: August 25, 2025 20:41 PM
views 54  views

वेंगुर्ले : हिंदू समाज बांधवांचे प्रथम पुज्यनीय दैवत असलेल्या श्री गणेशाचा जन्म दिवस म्हणजे गणेश चतुर्थी सण बुधवार दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या भक्तीभावाने साजरा होत आहे. त्या निमीत्ताने शहरातील गणेश भाविक व त्यांच्या कुटुंबियांकडून संदेश निकम मित्रमंडळाच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याचा व हे मित्रमंडळ करीत असलेले मंडळाचे संस्थापक माजी नगराध्यक्ष संदेश निकम व माजी नगरसेविका सौ. सुमन निकम यांना मंडळाचे कार्य यापुढेही दुप्पट ताकतीने चालू रहाण्यासाठी त्यांना गणेश भक्तांसह त्यांच्या कुटुंबियांकडून वेळोवेळी शुभाशिर्वाद लाभावेत. या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे गणेश चतुर्थीत गणेशाचे पुजनासह लागणारे साहित्य माध्यमातून घरोघरी जाण्याचा प्रयत्न संदेश निकम व सौ. सुमन निकम यांचा आहे.

   संदेश निकम मित्र मंडळ, वेंगुर्लाचे कार्य गेली १२ वर्षे आरोग्य सेवेअंतर्गत अखंड रूग्णवाहिकेची सेवा कोरोना कालावधीत शहरांत तसेच बाहेरील व्यक्तींना सर्व प्रकारचे मदत कार्य शालेय मुलांच्या शिक्षण प्रवेश, शैक्षणिकदृष्ट्या विविध स्वरूपाची मदत कार्य शासनाच्या विविध योजनांच्या लाभांसाठी महिला व पुरूषांना मदत कार्य गोरगरीबांना सण कालावधीत तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत कार्य करीत आहे. 

   या कार्याला अधिक बळकटी देण्याऱ्या शहरातील गणेश पुजन करण्याऱ्या गोरगरीब नागरिकांना गणेश पुजन साहित्यासह शिद्याचे वितरण शुभारंभ प्रतिवर्षीप्रमाणे संदेश निकम यांनी दाभोली नाका येथील कार्यालयात आज करण्यात आला.  

   यावेळी दाजी नांदोसकर, वैभव फटजी, दाभोली उपसरपंच पपल बांदेकर, युवासेनेचे सिध्देश कोले, अविनाश सडवेलकर, रँक्स परेरा, पप्पा गावडे, विकी फर्नांडिस, पिंटू धावडे, श्री. पवार, श्री. मयेकर यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.