
सावंतवाडी : मातृभूमीसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या वीरंगणांमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव अग्रगण्य स्थानी येते. अखंड हिंदुस्थानला आपल्या कर्तृत्वाने प्रकाशित करणारी विरांगणा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होत. कुठल्याही औपचारिक पदवीदान समारंभात न जाताही लोकमाता, राजमाता, वीरांगणा, पुण्यश्लोक, देवी, गंगाजल, निर्मळ मातोश्री अशा रयतेने हृदयातून दिलेल्या पदव्या तीनशे वर्षानंतरही टिकून आहेत, हे त्यांच्या कार्याचे आणि जनमानसातील त्यांच्या स्थानाचे द्योतक आहे. अहिल्यादेवींचे धार्मिक जीवन समृद्ध होते. त्यांच्या धर्मशील आणि धर्माभिमानी कार्यामुळे त्यांना भारतीय मंदिरांच्या प्रणेत्या म्हटले जाते. त्यांचे हे महान कार्य या माहितीपत्रकाच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचवावे, असे आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केले.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून अहिल्यादेवींचे अतुलनीय कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हा प्रमुख उद्देश आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अहिल्यादेवींच्या कार्यपुस्तिकेच्या वाटपाचा शुभारंभ कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आला.
या अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसन्न उर्फ बाळू देसाई यांनी सर्वप्रथम आमदार निरंजन डावखरे यांना अहिल्यादेवींची प्रतिमा असलेले स्मृतिचिन्ह भेट देऊन त्यांचा सत्कार केला.
या प्रसंगी महिला जिल्हाध्यक्षा श्वेताताई कोरगावकर, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, माजी तालुकाध्यक्ष रविंद्र मडगावकर व संदीप गावडे, सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, दोडामार्ग मंडल अध्यक्ष दीपक गवस, वेंगुर्ले मंडल अध्यक्ष पप्पू परब, महिला जिल्हा सरचिटणीस सौ. शर्वाणी गावकर, मानसी धुरी, प्राजक्ता केळुसकर, सुजाता पडवळ, मिसबा शेख, दिपाली भालेकर, युवा मोर्चाचे पराशर सावंत, बाबा काणेकर, नगरसेवक आनंद नेवगी, सिद्धेश तेंडोलकर, अमित गवंडळकर, महेंद्र परब, सचिन गावकर, जगन्नाथ गावकर, सरपंच देवेंद्र शेटकर, प्रमोद गावडे, उल्हास परब, कार्यालय प्रमुख दशरथ मांजरेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.