आनंदाश्रयात जीवन उपयोगी वस्तूंचे वाटप !

Mankind Pharma आणि डॉ. जी. टी. राणे , कुडाळ यांचा सहभाग
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 02, 2024 10:37 AM
views 133  views

सिंधुदुर्गनगरी : Mankind Pharma ही कंपनी आपल्या CSR फंड मार्फत अनेक समाजोपयोगी उपक्रम करत असते .आणि त्यातील च  एक उपक्रम आनंदाश्रय (अणाव) येथे   वृद्ध व्यक्तींना ३८ किट चे वाटप केले . या किट मध्ये ब्लँकेट , बेडशीट ,आणि उशी अशा वस्तूंचा समावेश होता.

यावेळी व्यासपीठ वर डॉ. जी. टी. राणे, बबन परब काका, काकी तसेच श्री नाईक ( सेक्रेटरी) आणि कंपनी चे प्रतिनिधी  योगेश वारंग , विजय दळवी उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करताना  डॉ राणे  म्हणाले की  बबन काका सारखी माणसे असल्याने अनेक व्यक्तींची सोय येथे होऊ शकली आणि त्यांनी आपले हे  एक प्रेमळ कुटुंब निर्माण केले तसेच   आनंदाश्रय चे  कौतुक केले. आणि Mankind कंपनी ल सुद्धा अशा नवोप्रक्रमाला खूप शुभेच्छा दिल्या.