रोटरी क्लब वेंगुर्लाच्यावतीने आयडियल स्टडी अँपचे वितरण

Edited by: दिपेश परब
Published on: August 21, 2025 17:13 PM
views 56  views

वेंगुर्ले : रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या वतीने पाटकर हायस्कूल वेंगुर्ला येथे इयत्ता दहावी मध्ये असणाऱ्या मुलांसाठी आयडियल स्टडी अँप चे वितरण केले. इयत्ता दहावी मध्ये असणाऱ्या मुलांना या अँप चा कश्याप्रकारे फायदा होणार आहे या बाबत रोटरी क्लब वेंगुर्ला सेक्रेटरी डॉ . राजेश्वर उबाळे यांनी प्रास्ताविकात सांगितले. 

यावेळी रोटरी अध्यक्ष आनंद बोवलेकर, असिस्टंट गव्हर्नर डॉ. प्रशांत कोलते व राजेश घाटवळ डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. आयडियल स्टडी अँप मोबाईलमध्ये कशा प्रकारे साठवणे या बाबत मार्गदर्शन असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने यांनी करून भविष्यातील आपलं जीवन चांगलं घडवण्यासाठी दहावीचा अभ्यास करताना टक्केवारी वाढवण्यासाठी या अँप चा फायदा कश्याप्रकारे होईल या बाबत मोलाचे मार्गदर्शन केले.  

 यावेळी पाटकर हायस्कूलचे शिक्षक महेश बोवलेकर, मुख्याध्यापक सुशांत धुरी, श्री गोसावी व इतर सर्व शिक्षकांचे सहकार्य मिळाले. यावेळी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे प्रेसिडेंट आनंद बोवलेकर, सेक्रेटरी डॉ राजेश्वर उबाळे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ (WGM) व सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला चे प्रेसिडेंट अपर्णा बोवलेकर, सदस्या आरती गिरप उपस्थित होत्या.