वेंगुर्लेत 200 बांधकाम कामगार बांधवांना गृहपयोगी साहित्यांचे वाटप !

Edited by: दिपेश परब
Published on: March 13, 2024 12:04 PM
views 210  views

वेंगुर्ला : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, महाराष्ट्र शासनाच्या वतीने बुधवार दिनांक १३ मार्च रोजी तालुक्यातील बांधकाम कामगार बांधवांना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांच्या उपस्थितीत गृहपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. 

    यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शक्तिकेंद्र प्रमुख विजय बागकर, निवृत्त कामगार अधिकारी किरण कुबल, संगणक ऑपरेटर प्रविण जाधव व स्वाती अणावकर, किट वाटप मदतनीस अमित कुबल व विष्णु रेडकर , पुजा बागकर इत्यादी उपस्थित होते .

  यावेळी बांधकाम कामगारांना मार्गदर्शन करताना प्रसंन्ना देसाई म्हणाले की, विकसित भारताच्या उभारणीच्या आकांक्षा पुर्ण करण्यात श्रमशक्तीचा मोठा वाटा आहे. या संकल्पनेतून नव्या भारतात कामगार आणि कष्टकऱ्यांचा आदर करण्याची संस्कृती उदयास येत आहे. देशाला आता आपल्या श्रमशक्तीचा अभिमान आहे. कष्टाचा आदर आणि कष्टकऱ्यांचा सन्मान हे मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय "श्रमेव जयते" च्या माध्यमातून मोदी सरकार कामगारांचे सक्षमीकरण करुन त्यांच्यासाठी सर्वसामावेश संरक्षणाची हमी देत आहे असेही श्री देसाई म्हणाले. यावेळी भाजप कामगार मोर्चाचे कार्यकर्ते तसेच शेकडो लाभार्थी उपस्थित होते.