दीपक केसरकर मित्र मंडळ पुरस्कृत गुरु सेवा सन्मान पुरस्कारांचं वितरण..!

Edited by: विनायक गावस
Published on: October 28, 2023 12:10 PM
views 97  views

सावंतवाडी : अनादी काळापासून गुरुची महिमा अपार आहे. कोणत्याही काळात शिक्षकांचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही. आज महाराष्ट्राच्या आणि एकूणच देशाच्या शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल होत असला तरी आणि शिक्षकांची भूमिका बदलत असली तरी गुरुजींची महती आणि गुरूंबद्दलचा आदर हा चिरकाल आहे. म्हणूनच शासनाच्या स्तरावर आणि विविध संस्थांच्या स्तरावर नैपुण्यवान आणि कौशल्यपूर्ण शिक्षण देणाऱ्या महान गुरुजनांचा सन्मान करणे क्रमप्राप्त ठरते, असे शिक्षकांबद्दलचे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित कार्यक्रमात केले.

सावंतवाडी येथील नामदार दीपकभाई केसरकर मित्र मंडळ पुरस्कृत गुरु सेवा सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यात शिक्षण मंत्री केसरकर बोलत होते. नाम. दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत गुरूसेवा सन्मान पुरस्कार वितरण सोहळा शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर भरत गावडे, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शिवसेना जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, कवी विठ्ठल कदम, प्रा. रूपेश पाटील, आबा केसरकर, कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, प्रा. सुषमा मांजरेकर, विशाखा पालव , गजानन नाटेकर, इंडियनएक्स सर्व्हिस लीगचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष शशिकांत गावडे आदि उपस्थित होते.

दरम्यान, शिक्षण मंत्री दीपक केसरकर पुढे म्हणाले की, राज्यातील एकही शाळा बंद होणार नाही. काही लोक एखाद्या शासनाच्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावतात आणि शासनाला बदनाम करण्याचं काम करतात. अशा अफवा पसरवून ते शैक्षणिक व्यवस्थेला अपाय कारक गोष्टी करीत आहेत, याची खंत वाटते. मात्र लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. जेव्हापासून मी शालेय शिक्षण मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला, तेव्हापासून शैक्षणिक व्यवस्थेला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने ठेवण्याचा आणि प्रत्येक शिक्षकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. यापुढेही शैक्षणिक व्यवस्थेला सर्वोत्तम करण्याचा आपला मानस असल्याचे मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक भरत गावडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य शासनाचा सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या प्राध्यापिका सुषमा मांजरेकर व विशाखा पालव

यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार कवी विठ्ठल कदम यांनी मानले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मंगेश मस्के, सावंतवाडी कोमसापचे तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, ज्ञानदीप शैक्षणिक सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक, वैभववाडी येथील शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र रावराणे, केंद्रप्रमुख म. ल. देसाई, कमलाकर ठाकूर, श्री. म्हाडगुत, राज्य शासनाचा सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते मुख्याध्यापक रघुनाथ घोगळे, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच नामदार दीपक भाई केसरकर मित्र मंडळ सावंतवाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ठरले पुरस्काराचे मानकरी -

सिताराम अर्जुन नाईक (उभादांडा, ता. वेंगुर्ला), दीपक केशव गोसावी (धामापूर, ता. मालवण), नंदकिशोर पांडुरंग म्हापसेकर (सोनावल), पूनम यशवंतराव खराटे (घोडदे ता. दोडामार्ग), दिनेश दळवी (जामसंडे नंबर १, ता. देवगड), अरविंद सरनोबत (माडखोल नंबर दोन, धवडकी, ता. सावंतवाडी), संतोष यशवंत मोहिते (मौंदे), अर्चना एकनाथ आंबेरकर (बांदा), दीपक दळवी (साटेली भेडशी), रेश्मा चोडणकर (दाभोली इंग्लिश स्कूल, ता. वेंगुर्ला),  नेहा नरेंद्र सावंत (इन्सुली नंबर एक), ज्योती पवार (करुळ गावठाण, ता. वैभववाडी), प्रा. आनंदी रघुनाथ घोगळे (टोपीवाला डीएड कॉलेज मालवण), महेश लाडू सावंत (नेमळे),  केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, अंगणवाडी सेविका अश्विनी आनंद राणे, दर्शना सुनील वराडकर (न्यू इंग्लिश स्कूल, कसाल, ता.कुडाळ),  दिव्यता दिनेश परब (वरस्कर विद्यामंदिर वराड). भिवा केशव सावंत (आडेली नंबर एक),  शामल चंद्रकांत धुरी (कालेली), माधवी मंगेश मस्के (बांबुळी), उदय शिरोडकर (केंद्रप्रमुख, कुडाळ),  शरद अर्जुन नादकर (नाधवडे),  संजय गोपाळ सावंत (फोंडा, सुतारवाडी),  डॉ. पी. जे. कांबळे (मुख्याध्यापक - विद्यामंदिर प्रशाला कणकवली), किशोर वालावलकर (कलंबिस्त) यांना पुरस्कार देऊन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.