
सिंधुदुर्गनगरी : शासनाचे महसूल विभागा मार्फत जे योजना राबवल्या जातात या योजनांचा ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी लाभ घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे वारस तपास याबाबत काही अडचणी असतील तर त्या अभियाना कालावधीत पूर्ण करून घ्याव्यात. याच प्रमाणे निराधारा माता असतील यांनी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या योजनेचा लाभ घ्यावा तसेच उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या गावातील महसूल विभागाशी प्रस्ताव प्रलंबित असतील तर किंवा नवीन प्रस्ताव करण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने जी नवीन योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली. 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक असतील यांच्यासाठी शासनाकडून मासिक 7000 रुपये मानधन मिळणार आहे . याचा लाभ गावातील ज्येष्ठ नागरिकांना होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे आवाहन कसाल सरपंच राजन परब यांनी महसूल सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे राज्यात 1 ऑगस्ट 2025 महसूल दिन व 1 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत महसूल सप्ताह 2025 साजरा करण्याबाबत शासनाने कळविले असून छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहा राबविले जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल सप्ताह निमित्त तहसीलदार कार्यालय कुडाळ यांच्या अंतर्गत येणाऱ्या कसाल मंडळ अधिकारी कार्यालयाच्यावतीने महसुली सप्ताह अंतर्गत कार्यक्रम आज ग्रामपंचायत कार्यालय कसाल येथे सरपंच राजन परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी कसाल पंचक्रोशीतील लाभार्थी नागरिक उपस्थित होते. यावेळी विविध शासकीय दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत महसूल प्रशासनाच्या विविध सेवा व योजन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यामध्ये सातबारा वाटप, उत्पन्न व व अधिवास दाखले, संजय गांधी योजनेचे मंजूर लाभार्थी यांना मंजुरी पत्र, वारस फेरफार इत्यादी लाभ देण्यात आले.
यावेळी गावराई येथील ग्रामस्थ गुरुनाथ परुळेकर यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्रास होतो याचा यांनी पाढाच वाचला कारण एखाद्या मयत व्यक्तीचे नाव रेशन कार्ड वर कमी करानेसाठी नागरीकांना कुडाळ या ठिकाणी जावं लागते रेशन कार्ड वर नाव घातल्यावर बरेच महिने लाभार्थ्यांची नावे ऑनलाईन दिसत नाहीत. यामुळे लाभार्थ्यांना रेशन मिळत नाही. तसेच सातबारा वारस तपास झाल्यानंतर ती नावे बऱ्याच महिन्यांनी ऑनलाईन दिसतात याचप्रमाणे फार्मर आयडी साठी बऱ्याच अडचणी असल्याचे ग्रामस्थांना नाहक त्रास होतो. असे बरेच मुद्दे यांनी आज अभियान कालावधीत उपस्थित केले .
यावेळी कसाल सरपंच राजन परब, कसाल पोलीस पाटील अनंत कदम, गावराई पोलीस पाटील स्वप्निल वेंगुर्लेकर, कसाल मंडळ अधिकारी चव्हाण भाऊसाहेब रानबांबुळी पोलीस पाटील मूणगेकर, कुडाळ पुरवठा निरीक्षक तवले, ग्राम महसूल अधिकारी पडवे सीएम कांबळे, ग्राम महसूल अधिकारी कसाल नवीन राठोड, ग्राम महसूल अधिकारी कुंदे, प्रशांत कुरणे आदी उपस्थित होते.