नॅब असोशिएशन व रोटरीच्या माध्यमातून चष्मा वाटप

Edited by: विनायक गावस
Published on: August 09, 2023 20:03 PM
views 88  views

सावंतवाडी : पत्रकार सर्वांच्या मदतीला धावून जातात, अनेकांना सहकार्य करतात. परंतू, पत्रकारांच्या मदतीला कुणीही धावून येत नाही. रोटरी क्लव व नॅबच्या माध्यमातून चष्मे देण्यासाठी राबविण्यात आलेला उपक्रम हा कौतूकास्पद आहे. आम्ही पत्रकार त्यांचे कायमचे ऋणी राहू असे मत जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी व्यक्त केले. सावंतवाडी पत्रकार संघ रोटरी क्लब सावंतवाडी आणि नॅब असोशिएशन सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडीतील पत्रकारांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.


पत्रकारांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता. याला चांगला प्रतिसाद लाभला. एखादी सामाजिक संघटना पत्रकारांच्या मदतीसाठी येते हे कौतूकास्पर आहे, असेच सहकार्य पुढे करण्यात यावे अस मत पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ‌. विनया बाड म्हणाल्या, सामाजिक काम करीत असताना आम्ही पत्रकारांचे देणे लागतो या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला होता. कार्यकाळ संपताना असा उपक्रम राबविता याचा मला अभिमान आहे. रोटरीचे अध्यक्ष सातोसकर म्हणाले, या ठिकाणी रोटरीच्या माध्यमातून भविष्यात खास पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्याचा आमचा मानस आहे. लवकरच हा कार्यक्रम घेण्यात येईल त्यासाठी आवश्यक असलेले सहकार्य आम्ही नक्कीच करू असं ते म्हणाले. यावेळी उपस्थित पत्रकारांना चष्म्याचे वाटप करण्यात आले.


याप्रसंगी नॅबचे अध्यक्ष अनंत उचगावकर, रोटरीचे अध्यक्ष सुहास सातोसकर, डॉ. विनया बाड, जेष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश्चद्र पवार,सचिव मयुर चराठकर, उपाध्यक्ष दीपक गांवकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, डिजीटल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार संतोष सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी केले तर आभार रामचंद्र कुडाळकर यांनी मानले.