वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील श्री देव मानसीश्वरच्या जत्रोत्सवाला भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. भर उन्हात रांगेत राहुन भाविकांनी देवाचे दर्शन घेतले. यावेळी आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून व वेंगुर्ला शिवसेनेच्या वतीने भाविकांना मोफत कोकम सरबत वाटप करण्यात आले. सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळ पर्यंत हे वाटप सुरू होते.
यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, जिल्हा संघटक संजू परब, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, होडावडा सरपंच रसिका केळुसकर, उपविभाग प्रमुख रवींद्र केळुस्कर, राजू परब यांच्यासहित शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.