ठाकरे गटाच्यावतीने कळसुलकर स्कूलमध्ये मोफत पुस्तकांचं वाटप

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं औचित्य
Edited by: विनायक गावस
Published on: July 27, 2023 14:21 PM
views 96  views

सावंतवाडी : पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थांना मोफत पुस्तकांच वाटप करण्यात आलं. विद्यार्थांना शालोपयोगी वस्तूंची भेट देत हा वाढदिवस साजरा करण्यात आला.


यावेळी हा उपक्रम राजकारण म्हणून नाही तर सामाजिक बांधिलकी म्हणून राबवीला. ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण या तत्वावर चालणारे आम्ही शिवसैनिक आहोत. त्यामुळे विद्यार्थांचे नुकसान होऊ नये यासाठी पुस्तकं देण्याचा निर्णय घेतला अस विधानं  तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केल. याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, शाळेचे शैलेश पै, ठाकरे शिवसेना पदाधिकारी मायकल डिसोझा, मेघश्याम काजरेकर, शिवदत्त घोगळे, योगेश नाईक आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.