
सावंतवाडी : भाजप युवा नेते संदीप गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. याचंच औचित्य साधत दयासागर छात्रालय रोणापाल येथे अन्नधान्याचे वाटप करण्यात आलं.
दयासागर छात्रालय रोणापाल येथे संदीप गावडे यांच्या वाढदिवसानिमित अनाथ आश्रमात अन्नधान्याचे वाटप करण्यात आलं. यावेळी गेळे सरपंच सागर ढोकरे, ॲड. चैतन्य सावंत आदी उपस्थित होते.