उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त अत्यावश्यक औषधांचे वाटप...!

Edited by: विनायक गावस
Published on: July 26, 2023 20:09 PM
views 129  views

सावंतवाडी : शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला अत्यावश्यक औषधांचे वाटप उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांच्या माध्यमातून प्रदान करण्यात आले. सावंतवाडी तालुक्यात बऱ्याच ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा असल्यामुळे प्रशासनाकडून औषधे येण्यापूर्वी सामाजिक बांधिलकीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने  सर्वसामान्य रूग्णांना औषधे उपलब्ध व्हावीत या उद्देशाने कफसिरफ,पँरासिटीमाँल,टाँनिक आदी उपयोगी औषधे  जनतेच्या सेवेसाठी  एकूण आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषध वाटपाचा शुभारंभ आजपासून करण्यात आला उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस हा सेवा आठवडा म्हणून साजरा  करताना कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाला सलाम करत जास्तीत गरजू रुग्णाला औषधे उपलब्ध व्हावी या उद्देशाने  प्राथमिक आरोग्य केंद्राना औषधांचे वाटप करण्यात  येत असल्याचे यावेळी बोलताना रुपेश राऊळ यांनी सांगितले.

या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम म्हैसके यांनी यापूर्वी दोन बेड या आरोग्य केंद्राला शिवसेनेच्या वतीने रुपेश राऊळ यांनी दिले असून आता औषधांचे वाटप केल्याने गोरगरिबांना यामुळे दिलासा मिळू शकेल असे सांगितले तर या औषध वाटपामुळे अवघा महाराष्ट्र सांभाळणाऱ्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वसामान्य रूग्णांचे आशिर्वाद मिळतील. असा विश्वास यामुळे बोलताना व्यक्त केला.

निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला  हिटर द्यावा अशी मागणी संजय तानावडे यांनी केली याला तात्काळ प्रतिसाद देत तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी येथे आठवड्यात वॉटर हीटर देण्याचे जाहीर केले या कार्यक्रमास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ

बाळा गावडे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार युवासेना तालुकाधिकारी वेत्ये सरपंच  गुणाजी गावडे,योगेश नाईक,सुनील गावडे,डाँ.विक्रम म्हैसके, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, उपतालुकाधिकारी आबा सावंत,महेश शिरोडकर, विनोद काजरेकर अनिल जाधव सचिन मुळीक संदीप पांढरे प्रशांत बुगडे दशरथ पेंडणेकर मिथुन जाधव नमिता जाधव संगीता मुळीक यशोदा परब  निरवडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर नेमळे उपसरपंच सखाराम राऊळ नितीन पांगम आदी उपस्थित होते.