कनेडीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य - खाऊचं वाटप..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 23, 2023 13:19 PM
views 114  views

कणकवली : महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवस नाटळ सांगवे विभागात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी केनेडी भाजप कार्यालयात विद्यार्थ्यांना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या उपस्थितीत शैक्षणिक साहित्य व जिलेबी आणि खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी विभागीय अध्यक्ष विजय भोगटे, सरपंच बापू सावंत, सरपंच संजय सावंत, सुरेश ढवळ, मयुरी मुंज, राजश्री पवार मिलिंद बोभाटे  यांच्यासह सरपंच उपसरपंच ग्रामस्थ आणि नाटक सांगवे विभागातील भाजप कार्यकर्ते हे उपस्थित होते.