
रत्नागिरी : मंगलमूर्ती मित्र मंडळ भेलसई यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत सह्यद्रि शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल भेलसई, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी या विद्यालयात इयत्ता आठवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश वावरे यांनी मुंबई मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कारिते, भेलसई मंडळाचे अध्यक्ष काशिनाथ कदम, तसेच महिला मंडळाच्या अध्यक्ष अनिता झुजम यांना या स्तुत्य उपक्रमाबद्दल कौतुक करून विद्यालयाच्या तर्फे त्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या शिक्षिका सौ. मानसी पवार यांनी केले, तर आभार साक्षी दळवी यांनी मानले.