
देवगड : रहाटेश्वर नं. १ व गढीताम्हणे तेलिवाडी शाळेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
सामाजिक कार्यकर्ते अमित कदम (गढिताम्हाणे) यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य व खाऊ देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमास रहाटेश्वर गावच्या सरपंच कल्पना कदम, गढिताम्हाणे गावचे पोलीस पाटील, रहाटेश्वर नं. १ शाळेचे मुख्याध्यापक संजय चव्हाण, तेलीवाडीचे मुख्याध्यापक. सुजित रानप, रहाटेश्वर व तेलीवाडी येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी, पालकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत नियमित अभ्यास करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन उत्तम प्रकारे करण्यात आले. उपस्थितांनी अमित कदम यांच्या सामाजिक बांधिलकीचे व उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांमुळे निश्चितच प्रेरणा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.











