गुणाजी गावडे यांच्याकडून मुलांना वह्या - छत्री वाटप...!

Edited by: विनायाक गावस
Published on: June 24, 2023 15:32 PM
views 147  views

सावंतवाडी : वेत्ये गावातील श्री कलेश्वर विद्यामंदीर शाळेत ग्रामपंचायत कार्यालय वेत्ये व सरपंच गुणाजी गावडे यांच्या वतीने शाळेतील सर्व मुलांना वह्या व छत्री वाटप कार्यक्रम करण्यात आला. यावेळी श्रीम शितल खांबल, उपसरपंच श्री महेश गावडे, सदस्य श्री भगवान गावडे, सदस्य श्री परशुराम पाटकर शाळा व्यवस्थापन कमिठी अध्यक्ष श्री शरद जाधव श्री संतोश गावडे कु. गिरीश खांबल आदि उपस्थित होते.

मान्यवरांच्या उपस्थितीत  शाळेतील मुलांना वह्या व छत्री वाटप करण्यात आल्या. भगवान गावडे सदस्य व महेश गावडे सदस्य परशुराम पाटकर शाळा व्यवस्थापन कमिठी अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  तसेच वेत्ये गावातील अंगणवाडी मुलांना श्री गुणाजी गावडे सरपंच यांनी स्वखर्चातून गणेशवेश देण्यात आले याबद्दल अंगणवाडी सेविका यांनी आभार मानले. तसेच सरपंच यांनी आपले मनोगत व्यक्त करून मुलांना मार्गदर्शन केले. शाळेतील शिक्षकवर्ग व मुख्याध्यापक व अंगणवाडी सेविका यांनी आमच्या ग्रामपंचायत वेत्ये सरपंच व सर्व सदस्य व ग्रामस्थ यांचे वेळोवेळी करत असलेल्या सहकार्या बद्दल आभार मानले.