रेडी येथे भाजपच्या वतीने विद्यार्थ्याना वह्या वाटप...!

Edited by: दिपेश परब
Published on: July 04, 2023 20:32 PM
views 268  views

वेंगुर्ला : रेडी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. 

रेडी येथील सेंट्रल प्रायमरी स्कुल नं १, श्री माऊली विद्यामंदिर व जि.प. पूर्ण प्राथमिक सुकळभाट शाळा नं २ च्या विद्यार्थ्यांना रेडी भाजपच्या वतीने व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ व सरपंच रामसिंग राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वह्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भाजप तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, शक्ती केंद्र प्रमुख जगन्नाथ राणे, तालुका कार्यकारणी सदस्य अरुण राणे, महेश कोनाडकर, तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर राऊळ, ग्राम कमिटी उपाध्यक्ष देवेंद्र मांजरेकर, सदस्य संदीप बुधजी, तालुका कार्यकारणी महिलामोर्चा सदस्य श्रद्धा धुरी, ग्रामपंचायत माजी उपसरपंच गायत्री सातोस्कर, प्रज्ञा राऊळ, युवा मोर्चाचे सागर राणे आदी उपस्थित होते.