पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामार्फत भेडशी बाजारपेठेतील शाळेत वह्या वाटप

Edited by: संदीप देसाई
Published on: August 01, 2023 18:14 PM
views 92  views

दोडामार्ग : भारतीय जनता पार्टीचे नेते तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्फत जिल्हातील पहिली ते चौथी मराठी शाळातील मुलांना शैक्षणिक कार्यात हातभार म्हणुन तसेच सामाजिक भावनेतुन मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपुर्ण जिल्ह्यात सुरू आहे. 

   त्याच पार्श्वभूमीवर भेडशी बाजारपेठ (खालचाबाजार)येथील शाळेतील मुलांना भाजपा ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिध्देश(भैय्या)मो पांगम व भेडशीतील युवा उद्योजक व पालक आत्माराम(दादा) टोपले यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक सिध्देश मणेरीकर, अंगणवाडी सेविका सौ. निशा काणेकर, सौ. शर्मिला परमेकर उपस्थित होत्या.