देवीचीवाडी शाळेत पालकमंत्र्यांकडून वह्या वाटप

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 05, 2023 14:59 PM
views 231  views

देवगड : देवगड येथील शाळा आरे देवीची वाडी येथे भाजपा आरे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्फत शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच ममता कदम, बूथ अध्यक्ष सत्यवान पाटोळे, मुख्याध्यापक जाधवर सर, उपसरपंच रत्नदीप कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य अजित कांबळे, माजी उपसरपंच महेश पाटोळे, माजी अध्यक्ष शा.व्य.समिती बाबा दुलम, प्रभाकर कदम, प्रसाद कांबळे, माजी चेअरमन संदिप कदम, ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊ कदम, कार्यकर्ते राजेंद्र सि. कदम, सुरेश कांबळे ,राऊत मॅडम,जगताप सर, कुलकर्णी सर व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी अजित कांबळे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

मुलांना जनरल नॉलेज संदर्भात काही प्रश्न विचारून चालू घडामोडींबाबत मुलांना अपडेट करण्याच्या सूचना त्यांनी शिक्षकांना केल्या.