
देवगड : जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग यांच्या सायकल बँक मधून जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेतील गरीब , गरजू व होतकरू विद्यार्थिनींना संस्थाध्यक्ष माजी आमदार अॅड.अजितराव गोगटे यांनी मोफत सायकलींचे वितरण केले. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील जाधव उपस्थित होते.
जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग ही संस्था जिल्ह्यातील गरीब , गरजू व होतकरू विद्यार्थिनीना आपल्या सायकल बँक मधून सायकली प्रशालांना सुपूर्द करतात.ज्या मुलींना ह्या सायकली वितरित केल्या जातात त्या मुलींनी आपले इयत्ता १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशालेला परत करायच्या असतात.परत करण्यात आलेल्या सायकली नवीन लाभार्थी विद्यार्थिनींना वितरित केल्या जातात.
सायकलचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये मंजिरी प्रसाद ठुकरूल, दुर्वा परेश चव्हाण, खुशी रूपेश चिंदरकर, कोमल शिवगोपाल निसाद यांचा समावेश आहे. मुलींच्या गरजा लक्षात घेऊन प्रशालेने मोफत सायकली वितरित केल्या बद्दल सर्व मुलींच्या पालकांनी प्रशालेला धन्यवाद दिले आहेत.