खिरापती सारखं 'भारतरत्न' पुरस्कारांचं वाटप : डॉ. जयेंद्र परुळेकर

Edited by:
Published on: February 09, 2024 14:49 PM
views 94  views

सावंतवाडी : लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांचे राजकारण करताना खिरापत वाटावी तसे आता "भारतरत्न" पुरस्कार दिले जात आहेत. एकाच वेळी पाच व्यक्तींना पुरस्कार देण्याची ही पहिलीच वेळ आहे.पण, ज्यांच्या जाज्वल्य हिंदुत्ववादी विचारांचे राजकारण करून सत्ता मिळवली त्या वि.दा.सावरकरांना मात्र भारतरत्न जाहीर करण्यात आलेले नाही अशी टीका उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे.

बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, माजी पंतप्रधान नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह

आणि शेतीविषयक संशोधक विचारवंत एम एस स्वामिनाथन अशा पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. पण, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरव यात्रा काढून राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांना भारतरत्न वाटप करताना सावरकरांचा विसर पडला आहे असं मत  डॉ जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केल आहे.