
सावंतवाडी : शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर भजनाचे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी भक्तांची गर्दी उसळली. सावंतवाडी तालुक्यातील २०० मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे भजन साहित्य सुपुर्द केले.
सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील ७५० भजन मंडळांना भजन साहित्य वाटप करण्यात येत असून त्यात सावंतवाडी तालुक्यातील २०० भजन मंडळांना भजन साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी नामदार दीपक केसरकर मित्र मंडळाचे अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख नारायण राणे व पदाधिकारी उपस्थित होते. भजन साहित्यामध्ये तबला किंवा मृदुंग,टाळ असे साहित्य वाटप करण्यात आले. सावंतवाडी तालुक्यातील २०० मंडळांना काझी शहाबुद्दीन हाॅल येथे हे वाटप करण्यात आले.
अशोक दळवी व राजन पोकळे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी श्री गणेश चतुर्थी सणाच्या निमित्ताने शिधा आणि भजन साहित्य वाटप करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. दिपकभाई यांनी भक्तांची सेवेला कायमच सहकार्य केले आहे. यंदा भक्तांना शिधा वाटप करताना तबला किंवा मृदुंग, टाळ भजन साहित्याचे वाटप केले आहे.