संजु परब यांच्या हस्ते 'आनंदाचा शिधा' वितरण प्रारंभ

माजी नगरसेवक आनंद नेवगी, विनोद सावंत, सत्या बांदेकर यांची उपस्थिती
Edited by: विनायक गांवस
Published on: October 22, 2022 16:51 PM
views 157  views

सावंतवाडी : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अंत्योदय आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानांतून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे किट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून हा आनंदाचा शिदा राज्यातील रेशन दुकानांच्या माध्यमातून वितरीत केला जात आहे. सावंतवाडी तालुक्यात मुळीक यांच्या रेशन दुकानावर भाजप नेते, माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यांच्या हस्ते हा 'आनंदाचा शिदा' वितरीत करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी, विनोद सावंत, सत्या बांदेकर आदी उपस्थित होते.