कारिवडेत 200 काजू - सुपारीच्या रोपांचं वाटप

लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीचा पुढाकार
Edited by: विनायक गावस
Published on: August 05, 2023 16:48 PM
views 168  views

सावंतवाडी : डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ला‌. भोजराज निंबाळकर यांनी दिलेल्या सेवांजली नुसार व माजी प्रांतपाल PMJF ला. सुनिल सुतार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी यांनी कारिवडे गावामध्ये 100 काजूची रोपे व 100 सुपारीची रोपांच वाटप शेतकऱ्यांमध्ये केले. झाडे लावा झाडे जगवा या उदात्त हेतूनं सावंतवाडी लायन्स क्लब यांच्याकडून कारिवडे गावांमधील शेतकऱ्यांना झाडांसोबत खतांचे वाटप करण्यात आले.

झाडे जगवण्याकरिता या खतांचा वापर शेतकऱ्यांना होणार आहे. या खतांसोबत व झाडांसोबत शेतकऱ्यांना शेती उपयोगी अवजारांचे देखील वाटप करण्यात आले. या अवजारांचा त्यांना पुढील भविष्यात देखील चांगल्या रितेने उपयोग होणार आहे. ह्या उपक्रमामध्ये लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष अमेय पै, सचिव अभिजीत पंदुरकर, खजिनदार सुनील दळवी तसेच ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब बोर्डेकर, संदेश परब, रवी स्वार, प्रकाश राऊळ ,दयानंद परब, अशोक देसाई ,सुनिता टाकेकर ,सुजाता परब, मेघना राऊळ, सोमेश टकेकर, स्वाती पै हे सर्वजण उपस्थित होते.