जि. प. ६ नंबर शाळेकडून संदीप गावडे यांचा सत्कार

Edited by: विनायक गांवस
Published on: October 13, 2024 12:59 PM
views 289  views

सावंतवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय सावंतवाडी नंबर ६ शाळेच्यावतीने भाजप नेते संदीप एकनाथ गावडे यांचा सत्कार करण्यात आला. गावडे यांच्या माध्यमातून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला सौर ऊर्जा संच देण्यात आला होता. यानिमित्त हा सत्कार करण्यात आला. 

यावेळी अनिकेत आसोलकर,दिलीप भालेकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, केशव जाधव सर, यांचासह शिक्षक, विद्यार्थी पालक उपस्थित होते.यावेळी संदीप गावडे यांनी सौर ऊर्जा कशी बनते, त्याचा वापर कसा होतो याबाबत विद्यार्थ्याना बोलताना मार्गदर्शन केले.