मणिपुर सरकार बरखास्त करा | राष्ट्रपती राजवट लावा : प्रविण भोसले

Edited by: विनायक गावस
Published on: July 25, 2023 14:15 PM
views 222  views

सावंतवाडी : मणिपूर येथे घडलेली घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने गांधी चौकात हिंसाचारच्या विरोधात दंडाला काळ्या फित लावून  मौन आंदोलन करण्यात आले. मणिपुर येथील सरकार बरखास्त करून तात्काळ राष्ट्रपती राजवट लावावी अशी ही मागणी यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केली. ते सावंतवाडीत मौन आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, नुकताच पीजीआय सर्वेनुसार महाराष्ट्र राज्य शिक्षणाचा दर्जा हा घसरला असून दोन नंबर वरून असलेला महाराष्ट्र राज्य हा 7 नंबर गेलाय. त्यामुळे केसरकर हे पूर्णपणे शिक्षणमंत्री म्हणून अपयशी ठरलेत असा आरोप राष्ट्रवादी कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी केला. राज्यात शिक्षण खात्यात नवीन नवीन जीआर का काढले जातात सकाळी एक जीआर संध्याकाळी एक जीआर काढून मुलांना व पालकांना का खेळवलं जातय असा संताप्त सवाल देखील घारे परब यांनी उपस्थित केला. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, महिला शहराध्यक्ष अँड सायली दुभाषी आदी उपस्थित होते.