वेळासमधील कासव संग्रहालयाबाबत उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

Edited by: मनोज पवार
Published on: March 19, 2025 19:14 PM
views 210  views

मंडणगड :  वेळास येथील समुद्र किनारी आढळून येणारे ऑलिव्ह रिडले जातीचे समुद्री कासवाचा जन्मोत्सव पाहण्यासाठी देश, राज्यभरातील अनेक पर्यटका या गावास दरवर्षी भेट देतात  अऱबी समुद्राच्या किनाऱ्यावरील निसर्ग रम्य वातावरणात पसरलेल्या या गावाता 2007 साली सागरी कासव संवर्धन मोहीम सुरु झाली. या मोहीमेच्या माध्यमातून हजारो कसवांना जीवनाचा नवीन मार्ग मिळाली आहे. या मोहीमेची दखल पुर्ण देशाने घेतली कासवांचा जन्मसोहळा पाहण्यासाठी पुर्ण देशातून पर्यटक या गावात येतात. यामुळे मिळालेली कासवांचे गाव ही नवीन ओळख आणखी पुढे नेण्यासाठी येथे जागतीक दर्जाचे कासव संग्रहालय उभे करण्यात यावे या मागणीसाठी येथील ग्रामस्थ आग्रही आहेत.

वेळास गावाचा समुद्र किनारा देशातील पहिला कासव संरक्षित किनारा म्हणून घोषीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर समुद्र किनाऱ्यालगतची ग्रामपंचायतीचे ताब्यातील चौदा एकर जागेची या प्रकल्पसाठी निवड करण्यात आली आहे. कासव संग्रहालय कसे असावे याचा पुर्ण मॉडेल येथील ग्रामस्थ हेमंत सालदूरकर यांनी प्रोजेक्ट रुपाने तयार केले आहे. यात जगातील सर्व जातीच्या कासवांचे संगोपन करणे अपेक्षीत आहे. त्यासाठी आवश्यक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात आला व श्री. सालदूरकर याकामी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करीत आहे.

नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी रत्नागिरीचा दौरा केला. यावेळी श्री. सालदुरकर, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष लुकमान चिखलकर, अँड राकेश साळुंखे, राजेंद्र पड्याळ, केतन दरिपकर, निशांत भाटकर, भालचंद्र नागवेकर, सुनील खाडे सालेम सय्यद आदीनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची या विषयाकरिता भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांशी सकारात्मक चर्चा करुन वेळास येथील प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री महोदयांनीही या संदर्भात योग्य ती कार्यवाही सुरु करण्याचे यावेळी आश्वासन दिले आहे.