
पणजी : माजी आमदार राजन तेली यांनी आज ३ जून रोजी गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. या भेटीत प्रामुख्याने सिंधुदुर्गातील टॅक्सी चालक बांधवांना गोवा राज्यामध्ये होणारा आर्थिक भुर्दंड कमी व्हावा, आरोग्य व्यवस्थेबाबतचे प्रश्न, मोपा एयरपोर्टमध्ये भरतीत सिंधुदुर्गातील युवकांना संधी देण्यासंदर्भात चर्चा झाली. त्याचबरोबर गोवा पत्रादेवी हद्दीवर स्थानिकांना होणारा त्रास यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली.