आपलेपणा...मायेची मिठी ; नितेश राणेंच्या भेटीची चर्चा

Edited by: भरत केसरकर
Published on: September 22, 2023 18:04 PM
views 878  views

सिंधुदुर्ग : भाजपचे युवा आमदार नितेश राणे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या कणकवली -देवगड -वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील फोंडा येथील एका गावात गणपती दर्शनासाठी गेले असता माजी सैनिकाच्या एका वयोवृद्ध विधवा महिलेने आमदार नितेश राणे यांना आलिंगन देत मुलाच्या मायेप्रमाणे डोक्यावरून हात फिरवत भरभरून आशीर्वाद दिलेत.

गणपती दर्शनाला नितेश राणे हे अचानक घरी गेल्यानंतर ही महिला चांगलीच भारावून गेली. आणि नितेश राणे हे आपल्या घरी दाखल झालेले बघून तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. नितेश राणेंचे तिने मुलाप्रमाणे आलिंगन देत स्वागत करत "नितेश,बाळ तू खूप मोठा हो" असे आशीर्वाद दिले. तर आग्रहाने जेवणाची पण विनंती केली. त्यावेळी नितेश राणे यांनी आपला गणपती पाच दिवस असल्याने मी आता मुंबईला निघालो आहे. गणपती पाचव्या दिवशी शनिवारी विसर्जन करून रविवारी पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहे.निश्चितच पुढच्या वेळी वेळ काढून आवर्जून तुमच्या घरी येईल आणी जेवण घेईन अशा पद्धतीचे आश्वासन दिल. यावेळी नितेश राणे आणि या महिलेमध्ये बराच वेळ चर्चा झाली. नितेश राणेंनी आपल्या आजीप्रमाणे वागणूक देत पाय वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले. मात्र यावेळी काही क्षणभर तिथिल वातावरण भावूक झालेले पाहायला मिळाले.

अखेर नितेश राणेंनी चहापान करून त्या महिलेचा निरोप घेऊन मुंबई त्या दिशेने रवाना झाले. पण पण नेहमीच आक्रमक वाटणारे नितेश राणे हे त्यांच्या हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्यांच्या नम्रतेची पण तेवढीच चर्चा चांगलीच सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहायला मिळत आहे.