अनर्थ टळला, सुदैवाने बचावले जीव !

परांजपे कुटुंब अडकल घरात | न.प.ने कोणत्या निकषांवर दिली परवानगी? ; नागरिकांचा सवाल
Edited by:
Published on: March 02, 2025 18:28 PM
views 606  views

सावंतवाडी : शहरातील सबनिसवाडा परिसरात बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे व बांधकामासाठी रस्त्यापासून २० ते २५ खोल खोदाई केल्याने रस्त्याची संरक्षक भिंत कोसळली. यात विद्युत पोल रस्त्यावर कोसळला. सुदैवाने रविवार असल्याने येथील वर्दळ कमी होती अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. तर माजी प्राचार्य गिरीधर परांजपे यांच्या घरी जाणाऱ्या पायऱ्या यात कोसळल्या. त्यामुळे रस्ता बंद होऊन परांजपे कुटुंब घरात अडकून पडले आहे. याबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत नगरपरिषदेने कोणत्या निकषांवर ही परवानगी दिली ? असा सवाल केला आहे. 

याबाबत चुकीच्या पद्धतीने खोदाई करून नागरिकांचा जीवास धोक निर्माण करणाऱ्या बिल्डरवर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. रस्त्यापासून काही फूट जागा सोडून खोदाई करणं आवश्यक असतान संरक्षक भिंतीला लागून खोदल गेलं. रस्त्यापासून सुमारे २०-२५ फुट खाली हे खोदकाम असल्यानं संरक्षक भिंतीसहित रस्त्यावर विद्युत पुरवठा करणारा पोल खाली कोसळला. रविवार असल्याने येथे वर्दळ नव्हती. दररोजचा हा वर्दळीचा परिसर आहे. या घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नाही. यात प्रा. परांजपे यांच्या घरी जाणाऱ्या पायऱ्या कोसळल्या. त्यामुळे परांजपे कुटुंब घरात अडकून पडलं आहे. कुटुंबात ज्येष्ठांची संख्या अधिक आहे. 


यावेळी शंभू विर्नोडकर, सुधाकर राणे, हर्ष सातोसकर, मीरा सावंत, तुषार बांदेकर, काका तेंडोलकर, सिताराम गावडे यांनी संबंधित ठेकेदाराला धारेवर धरले. चुकीच्या पद्धतीने चालू असलेले काम होऊ देणार नाही असा इशारा दिला. याबाबतची सखोल चौकशी प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.