दिव्यांग मुलांच्या कौशल्य विकासासाठी आराखडा तयार करणार

मंत्री दीपक केसरकरांचं लक्ष वेधणार : राजन पोकळे
Edited by: विनायक गावस
Published on: December 07, 2023 15:11 PM
views 73  views

सावंतवाडी : दिव्यांग मुलांना आई-वडील सांभाळून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणतात. आता समाजाबरोबर आमचीही जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग मुलांच्या कौशल्य विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे एक आराखडा तयार करून सादर करत नवोपक्रम हाती घेण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही माजी उपनगराध्यक्ष तथा दीपक केसरकर मित्र मंडळाचे अध्यक्ष राजन पोकळे यांनी दिली.

समग्र शिक्षा समावेशीत समग्र शिक्षा अभियानांतर्गत दिव्यांग समता सप्ताह बाल आनंद मेळावा व पालक उद्बबोधन कार्यशाळेच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात राजन पोकळे बोलत होते. 

यावेळी शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा अँड निता सावंत कविटकर, शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, शिक्षणमंत्र्यांचे सचिव, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, गजानन नाटेकर, नंदू गावडे,सौ स्वप्ना नाटेकर, गटशिक्षणाधिकारी दुर्वा साळगावकर, म ल देसाई, नरेंद्र सावंत, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष राजन रेडकर, सौ भारती मोरे, आर पी डी हायस्कूल मुख्याध्यापक जगदीश धोंड, गोपाळ गावडे, प्रमोद पावसकर, पुजा नाईक, लतिका सिंग, ज्योती मेस्त्री, सध्या मोरे, अनिता शिंदे, निलीमा चलवाडी,भारती परब, शिक्षक व सर्व साक्षरता अभियान योजना शिक्षक उपस्थित होते.

राजन पोकळे म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग मुलांच्या बाबतीत शिक्षणमंत्री दीपक केसरकर मित्रमंडळाच्यावतीने नंदू गावडे एक अहवाल तयार करतील. या अहवालाच्या माध्यमातून दिव्यांग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काय करायचे ते शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्यासमोर ठेवून नवोपक्रम हाती घेण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

यावेळी मंत्री केसरकर यांचे सचिव, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे म्हणाले, दिव्यांग मुल, पालक यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे. सुंदर मुलांची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. प्रत्येक मुल आपल्या आई वडिलांना प्रिय व सुंदर असते. या मुलांत काही तरी कमतरता आहे तशीच आमच्यातही काही तरी कमतरता आहे त्यामुळे प्रत्येकाने आनंदी जीवन जगू द्या. माझं मुलं जगातील सर्वात सुंदर आहे अशी भावना ठेवून पालनपोषण केले पाहिजे.या मुलांना शिक्षणमंत्रालयच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. 

यावेळी गटशिक्षणाधिकारी दुर्वा साळगावकर, डायटचे श्री गवस यांनी मार्गदर्शन केले. गोपाळ गावडे यांनी प्रास्ताविक तर आभारप्रदर्शन रामचंद्र माडखोलकर यांनी केले. डॉ. अजय स्वार यांचं देखील मोलाचं सहकार्य हा उपक्रमास लाभले.