सावंतवाडीत उद्या दिव्यांग कार्यशाळा व दिव्यांग जनजागृती मोहीम

साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग व सामाजिक बांधिलकी,सावंतवाडी यांचे संयुक्त आयोजन
Edited by: रुपेश पाटील
Published on: December 02, 2022 08:38 AM
views 147  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग संस्था दिव्यांगांचा सर्वांगीण विकास, त्यांच्या न्याय व हक्कासाठी कार्यरत आहे. सावंतवाडी येथील दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र आणि सामाजिक बांधिलकी सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी मोफत कार्यशाळा व जनजागृती मोहीम आयोजित केली आहे. सावंतवाडी एस. टी. स्टँड समोर, काझी शाहबुद्दीन हॉल,सावंतवाडी. येथे सकाळी १०:३० ते  दुपारी ३:३० या वेळेत कार्यशाळा आयोजित केली आहे. यामध्ये अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल परुळेकर, उपाध्यक्ष कमलताई परुळेकर, प्रमुख पाहुणे माजी नागराध्यक्ष बबन साळगावकर, जिल्हा विधी व न्याय समितीचे न्यायाधीश श्री. म्हालटकर,  सावंतवाडीचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर या मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.

कार्यशाळेची उद्दिष्टे :
३ डिसेंबर 'जागतिक दिव्यांग दिना'निमित्त दिव्यांग बांधवांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेसाठी स्वेच्छेने काहीजण वेगवेगळी वेशभूषा करू शकतात.

चित्रकला स्पर्धा :
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी व बांधवांसाठी वय वर्ष ( ६ ते ६० ) खुल्या चित्रकला स्पर्धा. चित्रकलेसाठीचे सर्व साहित्य कार्यशाळेत दिले जाईल. सर्वांना सहभाग प्रमाणपत्र व प्रथम, द्वितीय,तृतीय व उत्तेजनार्थ दोन अशी पाच पारितोषिके दिली जातील.

विविध योजनांची माहिती :
दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर बनण्यासाठी असलेल्या शासकीय विविध योजना, तसेच शासन निर्णयातील तरतुदी, कायदेविषयक  जनजागृती. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या असलेल्या शैक्षणिक सोयी- सुविधा याबद्दलची सर्व ईतंभूत माहिती दिली जाणार आहे.

दिव्यांग बांधवांना प्रशिक्षण :
जनशिक्षण संस्थेकडून  आपल्या दिव्यांग विकास केंद्रामध्ये वय वर्ष १५ ते ३५  विविध प्रकारचे मोफत प्रशिक्षण देऊन केंद्र सरकारचे सर्टिफिकेट दिले जाईल. यासाठीची या कार्यशाळेत नाव नोंदणी केली जाईल.
१) फळे आणि भाजीपाला प्रक्रिया आणि जतन.
२) संगणक प्रशिक्षण: टैली किंवा डाटा ऑपरेटिंग.

क्रीडाविषयक मार्गदर्शन :
दिव्यांग विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरापर्यंत जाण्यासाठी चे सर्व प्रकारच्या खेळाचे मार्गदर्शन आपल्या संस्थेमार्फत तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांच्या व कोच यांच्या मार्फत दिले जाईल. असे क्रीडाविषयक प्रॅक्टिस झालेले विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी पुढे राष्ट्रीय स्तरावर पाठवले जाईल व पॅरालिम्पिकमध्ये देखील आपली मुले झळकतील.
यासाठी विद्यार्थ्यांची नाव नोंदणी केली जाईल.

फिजिओथेरपी :
ज्या दिव्यांग विद्यार्थ्यांना फिजिओथेरपीची गरज आहे अशांना तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट यांच्याकडून मोफत फिजिओथेरपी दिली जाणार आहे. तसेच यापुढेही फिजिओथेरपी देण्यासाठीची नाव नोंदणी केली जाणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बंधू-भगिनींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन साहस संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा रूपाली पाटील व सामाजिक बांधिलकी संघटनेचे रवी जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९४०५२६४०२७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा .