दिव्यांग नव मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती विशेष अभियान | मालवण तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 16, 2023 16:30 PM
views 253  views

मालवण : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाने दिव्यांग नव मतदार नोंदणी, आणि नाव दुरुस्ती विशेष अभियान हाती घेतले आहे. त्यासाठी मालवण तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 29 ऑगस्ट पर्यंत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन तहसीलदार वर्षा झालटे यांनी केलं आहे. 

मालवण तालुक्यातील दिव्यांग नागरिक असतील त्यांचे मतदार नाव नोंदणी, मतदार यादीतील नाव दुरुस्ती, नाव वगळणे, मतदाना दिवशी निवडणूक आयोगाकडून दिव्यांगांना पुरविण्यात येत असलेल्या साहित्याबद्दल माहिती व्हावी यासाठी निवडणूक विभागाने एक कार्यक्रम आयोजित केला आहे. या सर्व प्रक्रियेसाठी निवासाचा दाखला, वाहन चालक परवाना, रेशनकार्ड, बँक पासबुक, आधारकार्ड, यासह अन्य कागदपत्रे सादर करायची आहेत.

त्यासाठी 21 जुलै ते 21 ऑगस्ट या कालावधीत तालुक्यातील मतदार केंद्रस्तरीय अधिकारी हे प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. याबाबत तालुक्यातील दिव्यांग संघटनांना सुद्धा कळविण्यात आले आहे. तर मालवण तहसील कार्यालय येथेही एक कक्ष स्थापन करण्यात आला असून 29 ऑगस्ट पर्यंत सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन तहसीलदार वर्षा झालटे यांनी केलं आहे.