दांडेली - आरोस बाजारात सलग 9 व्या वर्षी 'दीपोत्सव' !

रत्नसुंदरी, मॅजिक शो, दशावतार नाट्यप्रयोग कार्यक्रमांचं आयोजन
Edited by: जुईली पांगम
Published on: November 01, 2024 11:48 AM
views 65  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील दांडेली - आरोस बाजार इथं दिवाळीनिमित्त जय हनुमान मित्रमंडळाच्यावतीने दीपोत्सव २०२४ चं आयोजन करण्यात आलं. यंदा या सोहळ्याच 9 वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही धमाकेदार कार्यक्रम होणार आहेत. रेकॉर्ड डान्स, मंगळागौर कार्यक्रम, खास आकर्षण मॅजिक शो, वेशभूषा, खास आकर्षक रत्नसुंदरी, दशावतार नाट्यप्रयोग असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. 

असे होतील कार्यक्रम !

शनिवार 2 नोव्हेंबर 2024 

सायं. 7 वा : उद्घाटन सोहळा 
रात्री 8 वा : रेकोर्ड डान्स स्पर्धा 
गाव मर्यादित / खुला गट 
जय हनुमान मित्रमंडळाचा मंगळागौर कार्यक्रम 
खास आकर्षण 
मॅजिक शो 

रविवार 03 नोव्हेंबर 2024 

सायं. 7 वा : वेशभूषा स्पर्धा 
मोठा गट / लहान गट 
खास आकर्षण 
रत्नसुंदरी 

सोमवार 04 नोव्हेंबर 2024 

रात्री 8 वा. : बक्षीस वितरण सोहळा 
रात्री 9 वा. : श्री वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा महान पौराणिक नाट्यप्रयोग 
पंचमुखी हनुमान  

हा 'दीपोत्सव' आरोस बाजार येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर होणार आहे.  धमाल उडवून देण्यासाठी जय हनुमान मित्रमंडळ सज्ज आहे. आपणही या कार्यक्रमाला उपस्थित रहावं असं आवाहन जय हनुमान मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आलंय.