त्रिमूर्ती मित्रमंडळाचा 'दिपावली शो टाईम' कलाकारांसाठी व्यासपीठ

अशोक दळवी यांचे कौतुकोद्गार
Edited by: विनायक गांवस
Published on: December 01, 2024 15:45 PM
views 120  views

सावंतवाडी : माजगाव त्रिमूर्ती मित्रमंडळाने "दिपावली शो टाईम" आयोजित करुन कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा गेली अनेक वर्षे राबविलेला उपक्रम कौतूकास्पद आहे. त्यांचा हा उपक्रम दिवसेदिवस बहरत जावो अशा शुभेच्छा शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी दिल्या. माजगाव-मेटवाडा येथील त्रिमूर्ती मित्रमंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत उद्घाटन श्री.दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत तब्बल ४५ हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी त्रिमूर्ती मित्रमंडळाचे अध्यक्ष राजन परब, उपाध्यक्ष सचिन मोरजकर, दत्तमंदिर कमिटीचे माजी अध्यक्ष अण्णा परब, महालक्ष्मी तथास्तू मॉलचे विनायक कोडल्याळ, विश्रांती चायनीज कॉर्नरचे राजेश नार्वेकर, पत्रकार अमोल टेेंबकर, व्याख्याते प्रा. रुपेश पाटील, भुवन नाईक, परिक्षक तुळशीदास आर्लेकर, अनिकेत आसोलकर, सावन जळवी आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. दळवी यांच्यासह श्री. टेंबकर आणि प्रा.पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी राबविण्यात येणारा हा शो टाईमचा उपक्रम कलाकारांना व्यासपिठ मिळवून देणार आहे असे त्यांनी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशांत मोरजकर, गितेश प्रभावळकर, प्रसाद सावंत, हर्षल आकेरकर, सौरभ पडते, राज परब, आशुतोष सावंत, मंगेश पावसकर, बापु भोगणे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचित कुडतरकर यांनी केले. आभार प्रशांत मोरजकर यांनी मानले.