कणकवली तहसिलदारपदाचा दिक्षांत देशपांडे यांनी स्विकारला पदभार..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 31, 2023 18:16 PM
views 731  views

कणकवली : जुलै कणकवली तहसिलदार आर. जे. पवार देवगड येथे बदली झाली आहे. त्यामुळे कणकवली तहसिलदार म्हणून दीक्षांत देशपांडे यांनी आज पदभार स्विकारला. त्याबद्दल नुतन तहसिलदार दिक्षांत देशपांडे यांचे तहसिलदार आर. जे . पवार यांनी पुच्छगुच्छ देवून स्वागत केले.

तसेच कणकवली तहसिल कार्यालयातील महसुल अधिकारी व कर्मचा-यांच्या वतीने पदभार स्विकारल्याने श्री. देशपांडे यांचे महसुल उपलेखापाल संभाजी खाडे यांनी पुच्छगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी निवासी नायब तहसिलदार गौरी कट्टे , नायब तहसिलदार शिवाजी राठोड , प्रिया परब , सत्यवान माळवे , मंडल अधिकारी दिलीप पाटील , संतोष नागावकर , बापू जाधव , श्री. चौगुले , श्रीमती तांबे , व महसुल कर्मचारी , व कोतवाल उपस्थित होते.