
सावंतवाडी : समाजात काम करणाऱ्या मान्यवरांची दखल घेऊन मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन भारततर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार कार्यक्रम आयोजन करण्यात आला आहे. यामध्ये कोकणसाद LIVE व दै. कोकणसादचे मुख्य संपादक सागर चव्हाण यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन महाराष्ट्र सचिव अमित वेंगुर्लेकर यांच्या संकल्पनेतून या सोहळ्याच आयोजन करण्यात आले आहे. उद्या माजगाव येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
याप्रसंगी मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन भारत तर्फे कोकणसाद LIVE व दै. कोकणसादचे मुख्य संपादक सागर चव्हाण, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, महाराष्ट्र पोलिस प्रमोद काळसेकर, अमित राऊळ, समाजसेवक अस्लम शेख, डॉ. गोविंद जाधव, राकेश केसरकर, रवी जाधव, संदीप चांदरकर, सुधीर आडीवरेकर, पत्रकार सुभाष चौगुले, जे.के. गोरंबेकर, रसूल शेख, कोल्हापूर अनंत शांती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था अध्यक्ष भगवान गुरव, स्वराज्य संघटना अध्यक्ष अमोल साटेलकर आदींचा सत्कार करण्यात येणार आहे. उद्या २८ एप्रिल रोजी २०२३ रोजी सायंकाळी ५ वा. माजगाव येथे हॉटेल माटव नजिक, कर्विल रो हाऊस येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन महाराष्ट्र सचिव अमित वेंगुर्लेकर यांनी केले आहे.