सावंतवाडी : शहरातीली सुप्रसिद्ध गेली ४५ वर्ष दर्जेदार ग्राहकसेवा देणाऱ्या श्री गणेश फोटो स्टुडिओ यांची दुसरी शाखा ''श्री गणेश डिजिटल मिडीया प्रिंटींग'' ग्राहकांच्या भेटीला आली आहे. रविवारी या नव्या दालनाचा शानदार शुभारंभ करण्यात आला. स्नेह नागरी पतसंस्था, सावंतवाडीचे चेअरमन अनंत उचगांवकर यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला.
शहरातील हॉटेल मॅगो जवळ, कोरगांवकर बुक स्टॉल समोर 'श्री गणेश डिजिटल मिडिया प्रिंटींग' ह दालन नव्यानं सुरू करण्यात आलं आहे. स्नेह नागरी पतसंस्था, सावंतवाडीचे चेअरमन अनंत उचगांवकर यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी भास्कर (नाना) देऊलकर, रवींद्र प्रभूदेसाई, प्रसाद सातार्डेकर,गणेश फोटो स्टुडिओचे सर्वेसर्वा सुनिल कोरगांवकर, सौ. स्मिता सुनिल कोरगांवकर, गणेश चोकोबाईटस्टचे सुरज सुनिल कोरगांवकर व सौ. ज्योती कोरगांवकर, कु. चैतन्या कोरगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
गेली ४५ वर्ष श्री गणेश फोटो स्टुडिओ आणि डिजीटल लॅबच्या माध्यमातून ग्राहकांना दर्जेदार सेवा दिल्यानंतर चॉकलेट फॅक्टरी आम्ही सुरू केली. ग्राहकांचा उदंड प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, कोल्हापूर, बेळगाव पेक्षा जलद अशी सेवा देण्यासाठी दुसरी शाखा श्री गणेश डिजिटल मिडीया प्रिंटींग या नावाने आम्ही सुरू केली आहे. हॉटेल मॅगो जवळ, कोरगांवकर बुक स्टॉल समोर आमचं नव दालन असून
या नव्या दालनात बॅनर प्रिंटीग, व्हिनेल प्रिंटींग ग्लॉसी/मॅट, कॅनवास प्रिंटींग, वनवे व्हिजन प्रिंटींग, जम्बो झेरॉक्स (कलर/ब्लॅक & व्हाईट), बॅक लाईट प्रिंटींग, एन्लार्जमेंट फोटो प्रिंन्ट, फोटो आणि डॉक्यूमेंट लॉमिनेशन, लग्नपत्रिका प्रिंटींग, टि शर्ट प्रिंटींग,मोबाईल कव्हर प्रिंटींग, मग, किचैन प्रिंटींग, पिलोज कव्हर प्रिंटींग, LED फोटो फ्रेम, ऍक्रेलिक फोटो फ्रेम, ऍक्रेलिक, वुड, ग्लास फोटो प्रिंटींगसह सर्व गिफ्ट प्रॉडक्ट प्रिंट करुन मिळणार आहेत. ग्राहकांनी एकदा अवश्य भेट द्यावी व आमच्या दर्जेदार सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन सुरज कोरगावकर यांनी केल आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या प्रसंगी उपस्थित राहून कोरगावकर कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. यावेळी रविंद्र प्रभू देसाई,नितीन कोरगावकर, प्रभाकर कोरगावकर, संतोष कोरगावकर, उत्कर्षा सातार्डेकर, उत्तम सातार्डेकर, चैतन्या कोरगावकर, साबाजी नार्वेकर, संजय नाटेकर, मेघा नाटेकर, सागर कोरगावकर, लवू वारंग, संजय धुमाळे, आनंद देऊलकर, अर्चना देऊलकर, महेश देऊलकर, समीधा देऊलकर, संजय मुधाळे, पंढरी आकेरकर आदी उपस्थित होते.