
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातील डायलेसीस सुविधा बंद असल्यामुळे तालुक्यातील रूग्णांची गैरसोय होत आहे. दररोज डायलेसीस साठी रूग्ण हे ग्रामीण भागातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात येतात. मात्र, डायलेसीस मशीन बंद असल्यामुळे रूग्णांचे हाल होत आहेत. प्रशासनाकडून तातडीनं ही मशीन दुरुस्ती करून सेवा सुरळीत करून न दिल्यास युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून लोकवर्गणीतून ही मशीन दुरुस्ती करून दिली जाईल, अशी माहिती युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिली.