
वेंगुर्ला : सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशान्वये व वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या १० डिसेंबर रोजी सायंकाळी ०४:३० वाजता वेंगुर्ला पोलीस व शालेय विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमानाने डायल 112 बाबत पथनाट्याचे सादरीकरण होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी वेंगुर्ला एसटी स्टँड समोरील पटांगणावर उपस्थित राहून डायल 112 जलद प्रतिसाद या कार्यप्रणाली बाबत माहिती घ्यावी व सहकार्य करावे. असे आवाहन वेंगुर्ला पोलिसांमार्फत करण्यात आलेले आहे