तेरवण इथं २ जून रोगनिदान शिबिर !

Edited by: संदीप देसाई
Published on: June 01, 2024 10:06 AM
views 134  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि दोडामार्ग तालुक्यातील तेरवण ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने  तेरवण येथील सातेरी भावई मंदिरात रविवारी २ जुन रोजी सकाळी ८ ते १२:३० या वेळेत निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

          या शिबिरात शल्यचिकित्सक डॉ शंकर सावंत, मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ नंददिप चोडणकर, नेत्र रोग तज्ञ डॉ स्वाती पाटील, स्त्रि रोग प्रसुती तज्ञ डॉ अंकिता मसुरकर, डॉ सौ मुग्धा ठाकरे, डॉ प्रविणकुमार ठाकरे, डॉ राहुल गव्हाणकर, डॉ चेतन परब रुग्णांची तपासणी करणार आहेत. त्यानंतर रुग्णांना मोफत औषधे देण्यात येणार आहे. या शिबिरात ब्लड शुगरचीही तपासणी करण्यात येणार आहे. 

          या आरोग्य व चिकित्सा शिबिराचा गरजूनी लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रविणकुमार ठाकरे  आणि तेरवण ग्रामस्थ मंडळ  यांनी केले आहे.