श्रीकृष्ण मंदिर ते मोरयाचा धोंडा देवस्थान पर्यंत धुपप्रतीबंधक बंधाऱ्याची मागणी

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 25, 2023 19:10 PM
views 346  views

मालवण : दांडी समुद्रकिनारी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून २०१५ साली श्री देव दांडेश्र्वर ते श्रीकृष्ण चौकचार मंदिर पर्यंत जसा बंधाराकम रस्ता झाला त्याच धर्तीवर श्री देव चौकचार श्रीकृष्ण मंदिर ते ऐतिहासिक मोरयाचा धोंडा देवस्थान पर्यंत धुपप्रतीबंधक बंधारा व्हावा या मागणीचे निवेदन दांडी येथील नागरिकांच्या वतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना देण्यात आले आहे. 

मागील काही वर्षात देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर वादळांची संख्या वाढत आहे. याचा फटका किनारपट्टीवर भागात बसत आहे. याचा विचार करता संरक्षणाच्या दृष्टीने तसेच मत्स्य व पर्यटनाच्या दृष्टीने हा बंधारा कम रस्ता महत्वाचा ठरेल असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, संदीप मालंडकर, संजू धुरी, रुपेश धुरी, सुनील धुरी, शंभा सारंग, नागेश कुबल, अभी धुरी, निलेश केळुसकर, हेमंत पराडकर, वरद धुरी, रणजित खवणेकर, लीलाधर धुरी, हर्षल मालंडकर, भाई मालंडकर, आदी नागरिक उपस्थित होते.