मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी धीरज परब, अॅड. अनिल केसरकर यांची निवड

Edited by: भरत केसरकर
Published on: November 26, 2023 11:38 AM
views 115  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा धीरज परब यांना संधी देण्यात आली आहे. तर सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची जबाबदारी ॲड. अनिल केसरकर यांच्याकडे देण्यात आली आहे. याबाबतची नव्याने कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. नव्या कार्यकारणीला एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे.यात महिला कुडाळ विधानसभा महिला जिल्हाध्यक्षपदी मोनिका फर्नांडिस यांची निवड करण्यात आली आहे.

गेल्या डिसेंबर २०२२ च्या पहिल्या आठवड्यामध्ये राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला होता. कणकवली येथील पक्षाच्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यांची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त केली होती.याबाबतची अधिकृत पत्रकार परिषद कणकवली येथे घेत बाळा नांदगावकर यांनी घोषणा केली होती. यानंतर तब्बल एक वर्षभर नवीन कार्यकारणी अस्तित्वात नव्हती. पक्ष बळकढीसाठी कार्यकारणी बदलण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला होता. लवकरच ही कार्यकर्णी जाहीर करू असे त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र तब्बल एक वर्षानंतर ही कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली आह. यात धीरज परब यांना पुन्हा संधी देण्यात आले आहे.इतर कार्यकारणी मध्ये कुडाळ विधानसभा जिल्हा सचिवपदी बाळा पावसकर, सावंतवाडी दोडामार्ग उपजिल्हाध्यक्षपदी सुधीर राऊळ, वेंगुर्ला कुडाळ उपजिल्हा अध्यक्षपदी कुणाल किनळेकर, मालवण- कणकवली उपजिल्हाध्यक्षपदी गणेश वाईरकर तर देवगड- वैभववाडीची जबाबदारी चंदन मेस्त्री यांच्याकडे देण्यात आली आहे. याबाबतची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

याबाबतचे पत्र नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, वेळोवेळी पक्षाची केलेली कामे आणि संघटना वाढवण्याचे काम लक्षात घेता तुमच्याकडे हे पद देण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात दृष्टीने काम करावे. कोणतीही कुचराई झाल्यास तडजोड स्वीकारली जाणार नाही. आपल्या सहकार्याकडून समाजाला कोणताही उपद्रव होणार नाही. अशा प्रकारचे आपले वर्तन असावे हीच अपेक्षा आहे. असे पत्र खुद्द राज ठाकरे यांनी त्यांना दिले आहे.या निवडीनंतर मनसे च्या नुतन कार्यकारिणीचे आणी पदाधिकारी यांचे अभिनंदन होत आहे