वंचितचे १८ डिसेंबरला धरणे आंदोलन

Edited by:
Published on: December 16, 2024 12:10 PM
views 265  views

सिंधुदुर्ग : वंचित बहुजन आघाडी आणि संविधान मानणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पक्ष संघटना यांच्या वतीने ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ २ तासाचे धरणे आंदोलन बुधवार दिनांक १८ डिसेंबरला दुपारी 3:30 ते 5:30 या वेळेत करण्याचे कणकवली येथील वंचित बहुजन आघाडी आणि संविधान मानणाऱ्या सर्व संघटना यांच्या बैठकीत ठरवण्यात आल्याच वंचितचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांनी सांगितलं.

परभणी गंगाखेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील भारतीय संविधानाची प्रतिकृतीच्या अवमान करण्यात आला त्या बाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकत्रितपणे कृती करण्यासाठी ची नियोजन बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर , युवक आघाडी अध्यक्ष सागर जाधव , भारतीय काँग्रेस पक्ष चे पदाधिकारी बाळू मेस्त्री , वंचित देवगड तालुका अध्यक्ष प्रभाकर साळसकर , शिरगाव सरपंच समीर शिरगावकर , सावंतवाडी तालुका माजी अध्यक्ष वासुदेव जाधव , बौद्ध सेवा संघ देवगड तालुका अध्यक्ष शामसुंदर जाधव , शिंपन मुंबई चे अध्यक्ष अनिल तांबे , कुडाळ तालुका सचिव कदम , वेंगुला तालुका उपाध्यक्ष सखाराम जाधव , गजानन जाधव , म्हापण जिल्हा परिषद मतदार संघ अध्यक्ष कानू उर्फ भाई परुळेकर , कणकवली तालुका जेष्ठ कार्यकर्ते शी. स .कदम (नारिंग्रेकर ) , सेवा निवृत्त डॉ . कदम , हरवळ आणि वागदे गावचे युवक आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

१८ तारीखला अल्पसंख्याक दिवस आहे . या दिवसाचे औचित्य साधून हा धरणे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरोगामी विचारांचा पक्ष ,संघटना , मंडळे आणि संविधान मानणाऱ्या धार्मिक , सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक , कामगार , असंघटित कामगार , महिला संघटना , महिला कर्मचारी संघटना ,  सर्व राजकीय पक्ष आणि संविधानाची गरज वाटणाऱ्या अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती , ओबीसी आणि आरक्षित समाज सिंधुदुर्ग , अल्पसंख्याक समाज अर्थात मुस्लिम , ख्रिश्चन , बौद्ध , जैन , लिंगायत  या सर्वांनी या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन वंचित बहुजन आघाडी आणि संविधान मानणाऱ्या सर्व संघटनांच्या वतीने करण्यात आले.