सा. बां. मंडळ सिंधुदुर्गच्या अधीक्षक अभियंतापदी धन्यकुमार बारवकर

पालकमंत्री नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केली होती मागणी
Edited by:
Published on: June 08, 2025 14:01 PM
views 160  views

सिंधुदुर्ग  : सार्वजनिक बांधकाम मंडळ सिंधुदुर्ग चे अधीक्षक अभियंता पदाच्या रिक्त जागी नेमणूक करण्यात आली असून या रिक्त पदावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित मुंबई या कार्यालयात कार्यरत असणारे धन्यकुमार दत्तात्रय बारवकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता यापुढे श्री बारवकर हे यापुढे अधीक्षक अभियंता मंडळ सिंधुदुर्ग म्हणून कामकाज पाहणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबतचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पत्रव्यवहार केला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम विभागाचा कारभार गतिमान होण्याकरिता हे रिक्त पद भरण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली होती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार हा गतिमान होण्याकरिता तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सिंधुदुर्ग मंडळाची नियुक्ती करत याकरिता आकृतीबंध निश्चित करून कर्मचाऱ्यांची देखील निश्चित केली होती. यातील अधीक्षक अभियंता हे महत्त्वाचे पद रिक्त होते. त्यामुळे याबाबत तातडीने अधीक्षक अभियंता नेमणूक करावी अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली. नंतर त्याची तात्काळ दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या पदावर धन्यकुमार बारवकर यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे येत्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत कामांना याचा फायदा होणार आहे.