उन्हाळ्यामध्ये धमाल कला आणि साहसी शिबिराचा आयोजन

बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल कणकवली प्रस्तुत धमाल उन्हाळी कला आणि साहसी शिबिर
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 15, 2023 15:23 PM
views 475  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांच्या बुद्धीला चालना मिळावी आणि त्यांची बौद्धिक पातळी उंचावी त्यासाठी बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही उन्हाळी सुट्टीमध्ये रिव्हर क्रोसिंग आणि फायर ड्रिल सारखे साहसी प्रकार त्याच बरोबर मुलांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक ठाकर आदिवासी चित्रकला शिकता यावी यासाठी ठाकर आदिवासी कला अंगण आर्ट गॅलरी, पिंगुळी आणि मार्शल कॅडेट फोर्स यांच्या अनुषंगाने शिबीर आयोजित करण्यात आले आहे.


कणकवली मध्ये प्रथमच - पिंगुळी चित्रकथी चित्रकला कार्यशाळा ज्यामध्ये चित्रकथेतील चित्रे, विविध पात्रे, दिवे, प्राणी, झाडे, महाल, साडी वरील चित्रे यांचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रोजेक्टरद्वारे चित्रकथी शैलीतील लघुचित्रफिती व माहिती दिली जाईल. मार्शल कॅडेट फोर्स द्वारे आयोजित साहस शिबिरामध्ये मुखतः योग, परेड, ड्रिल, कमांडो नेट, मंकी क्रोल, तिरंदाजी यांचे वैयक्तिक व सामूहिकरित्या प्रशिक्षणाची संधी दिली जाईल. रिव्हर क्रोसिंग, ऑब्स्टॅकल क्रोसिंग, रायफल शूटिंग, लाठी काठी, स्वसंरक्षण, एरोबिकस, मल्लखांब आणि बरंच काही  या शिबिराच्या माध्यमातून मुलांना शिकता येईल.

हे शिबीर, दिनांक १९ एप्रिल २०२३ ते २२ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल च्या नयनरम्य पटांगणावर सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत चालेल. या शिबिरासाठी वयोगट ७ ते १६ वर्षांवरील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. या शिबिराचे विद्यार्थ्यांसाठी शुल्क रु. १५०० /- (जेवण आणि नाष्टा समाविष्ट)

नाव नोंदणीसाठी खालील नंबरवर संपर्क करा:

• श्वेता सुद्रिक 8080494256 

•  गौरी परब  7841831896